देवरूख येथे सुरू करण्यात आलेल्या कोवीड-19 केअर सेंटर साठी पंचायत समिती संगमेश्वर (देवरूख) कडुन मदत

0

संगमेश्वर : संगमेश्वर तालका अंतर्गत देवरूख येथे सुरू करण्यात आलेल्या कोवीड-19 केअर सेंटर साठी पंचायत समिती संगमेश्वर (देवरूख) कडुन मदत करण्यात आली. पंचायत समिती संगमेश्वर (देवरूख) कार्यालयांतर्गत पंचायत समिती सर्व पदाधिकारी, पंचायत समिती अधिकारी/कर्मचारी, बांधकाम उपविभाग देवरूख कडिल अधिकारी/कर्मचारी, ग्रामिण पाणीपुरवठा उपविभाग देवरूख कडिल अधिकारी /कर्मचारी, शिक्षण विभागाकडिल कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडिल अधिकारी कर्मचारी, तसेच जि.प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटना अशा सर्व अधिकारी/कर्मचारी मिळुन रोख रक्कम रूपये 1,11,000/- मा. खासदार श्री. विनायकजी राऊत साहेब, यांचे हस्ते मा. तहसिलदार श्री. सुहास थोरात साहेब यांचेकडे सुपुर्त करण्यात आले. तसेच पंचायत समितीच्या वतीने दानशुर व्यक्तिना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार संगमेश्वर तालुका ठेकेदार असोसिएशन यांचेमार्फत 100 इलेक्ट्रिक केटल्स देण्यात आले आहेत. श्री. जनक शेठ जागुष्टे यांचेकडुन 1000 लिटर क्षमतेच्या 3 पाणी साठवण टाक्या, तसेच केमिस्ट असोसिएशन देवरूख यांचेकडुन ग्लोव्हज 5 बॉक्स मास्क 100 व व्हिटॅमिन सी गोळया – 2000 अशा प्रकारे मदत स्वरूपात पंचायत समितीच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:24 PM 29-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here