रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्र घेताना होणारी गैरसोय आणि त्यांची होणारी हेळसांड तसेच इतर अनेक प्रलंबित प्रश्नां)साठी दिव्यांग संघटनांकडून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त येत्या ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे.
रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांगांसाठी बुधवार आणि शुक्रवार हे राखीव दिवस ठेवण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी त्यातील शुक्रवार रद्द करण्यात आला. आता आठवड्यातील एकाच दिवशी दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना तपासून प्रमाणपत्र दिले जाते. आठवड्यातून दोन दिवस होते, तेव्हा विभागणी होत होती. मात्र आता त्यासाठी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे दिव्यांग रुग्णांची गैरसोय होते. जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ही अडचण सोडवावी, या मागणीसाठी जागतिक दिव्यांग दिनी आंदोलन छेडण्यात येणार आहे.
