चिपळूणात डुकराचे मटन विकले जात आहे बाजारात, शिकारी आणि विक्रेते मोकाट

0

चिपळूण, ता. १ : तालुक्यातील ग्रामीण भागात गावठी बॉम्बने रानडुकरांची शिकार सुरू आहे. डुकराचे मटण बाजारात खुलेआम विकले जात आहे. कायदेशीर कारवाई होत नसल्यामुळे शिकारी आणि विक्रेते मोकाट आहेत. चिपळूण तालुक्यातील बहुतांशी गावात जंगल आणि जंगलालगत शेती आहे. या ठिकाणी येणाऱ्या रानडुकरांची शिकार केली जात आहे. धरणे, तलावाच्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या रानडुकरांचीही शिकार केली जात आहे. रात्रीच्या वेळी शिकार झाल्यानंतर दिवसा त्याचे मटण सागाच्या पानात ठेवून बाजारात विकले जाते. बोकडाच्या मटणापेक्षा डुकराचे मटण चविष्ट आणि २०० ते २५० रुपये किलो दराने विकले जाते. त्यामुळे बाजारात आणलेले मांस हातोहात विकले जात आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here