मजगाव येथे तरुणाला मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : मजगाव येथील शाळेजवळ तरुणाला मारहाण व दुखापत केल्याप्रकरणी दोघा संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इरफान हमीद मुकादम व आश्रफ हमीद मुकादम (दोघेही रा. मजगाव-रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी सहाच्या सुमारास मजगाव शाळेजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार फुजेल अहममियाँ काझी (वय २५, मजगाव-रत्नागिरी) हे सिगारेट ओढण्याकरिता शाळेजवळ गेले असता, संशयितांनी त्यांना मारहाण करून दांडक्याने दुखापत केली. या प्रकरणी काझी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस फौजदार पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here