पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मंत्रिमंडळ बैठक; देशातील कोरोना पार्श्वभूमीवर चर्चा

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसोबतच देशातील मृत्यूदरातही वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे पार पडणार आहे. ज्यामध्ये मंत्रिमंडळाच्या सदस्यांव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. अशातच याकाळातील केंद्रीय मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक असणार आहे. या बैठकीत 18 ते 44 नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. 1 मेपासून लसीकरणाचा हा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच मंत्र्यांना जनतेसोबत चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. यापूर्वी पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:31 AM 30-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here