दोन दुचाकींची समोरासमोर धडक

0

रत्नागिरी : दुचाकी निष्काळजीपणे चालवून दुसऱ्या दुचाकीला समोरुन ठोकर देऊन अपघातास कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अम्मान नासीर कोळसेकर (वय २३, रा. मुस्लीमवाडी-मजगाव) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना २१ नोव्हेंबरला दुपारी साडेचारच्या सुमारास उद्यमनगर नाईक हायस्कूलच्या पाठीमागील गेटजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित स्वार दुचाकी (क्र. एमएच-०८ एजे १९४६) निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या सुरेंद्र धोंडू डाफळे यांच्या दुचाकीला (क्र. एमएच-०८ एन ४६२) समोरून ठोकर देऊन अपघात केला. या प्रकरणी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल इंदुलकर करत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here