दुचाकीच्या धडकेत महिला जखमी

0

रत्नागिरी : दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला जखमी झाली असून दुचाकी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार कुर्ली येथे ३० नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला. मयूर सुरेश कांकडकी (शिरगाव, रत्नागिरी) असे त्या चालकाचे नाव आहे. प्रतीक्षा प्रकाश तोडणकर (वय ६०, रा. कुर्ली, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. शनिवारी सायंकाळी प्रतीक्षा या कुर्ली बसस्टॉपजवळ रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी मयूर दुचाकी (एमएच०८-एक्स-८०८८) घेऊन पावस ते रत्नागिरीच्या दिशेने येत होता. तो कुर्ली बसस्टॉप जवळ आला असता, त्याने प्रतीक्षा तोडणकर यांना धडक दिली. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here