रत्नागिरी ; इनव्हायरोकेअर सुरेश आर अम्रितकर सुवर्णपदक रत्नागिरी उपकेंद्रातून परीक्षा दिलेली रत्नागिरीची सुकन्या निदा नझीर मुल्ला हिने पटकावले आहे. एमएससी २०१९ च्या परीक्षेत पर्यावरणशास्त्र विषयात महराष्ट्रात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल तिला हे सुवर्णपदक देण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात २६ नोव्हेंबर रोजी तिला गौरवण्यात आले. निदाने बीएससी पर्यंतचे शिक्षण रत्नागिरी गोगटे कॉलेजमध्ये पूर्ण केले तर एमएससीची परीक्षा रत्नागिरी उपकेंद्रातून दिली होती. निदाने या मिळविलेल्या उतुंग यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.