रत्नागिरी : शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून ओळख असणारे डॉ. समीर जोशी आणि डॉ. रत्ना जोशी यांचे सुपुत्र दंतवैद्य डॉ. क्षितिज जोशी यांच्या हॅपी स्माईल्स डेंटल वेलनेस क्लिनिक चे उदघाटन रविवार दिनांक १/१२/२०१९ रोजी रत्नागिरीतील जेष्ठ व नामवंत दंतवैद्य डॉ. चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते पार पडले. यानिमित्ताने आरोग्यसेवेत सेवाभावी व्रत जपणाऱ्या जोशी कुटुंबाची पुढची पिढी देखील त्यांच्याच पावलांवर पाउल ठेवत आरोग्य सेवेत दाखल झाली. डॉ. क्षितिज जोशी याने तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय वारणानगर येथून दात वाचविण्याच्या शास्त्रातील पदव्युतर परीक्षेत (M.D.S.) उत्तम यश संपादन केले आहे. डॉ क्षितीज जोशी यांचे पणजोबा कै. डॉ. अ. वा तथा काका जोशी हे रत्नागिरीतील पहिले एम.बी.बी.एस डॉक्टर होते. डॉ. क्षितीज जोशी यांचे काका डॉ. चंद्रशेखर जोशी हे देखील रत्नागिरीतील नामंकित दंतवैद्य म्हणून ओळखले जातात. संपूर्ण जोशी कुटुंबच रुग्णाप्रती असणाऱ्या सेवाभावी वृत्तीमुळे रत्नागिरीत प्रसिद्ध आहे. या सर्वांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आपण रत्नागिरीमध्येच व्यवसाय सुरू करीत असल्याची भावना डॉ. क्षितीज यांनी या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. या उदघाटना निमित्ताने आयोजित केलेल्या समारंभास त्याला शुभेच्छा देण्यासाठी रत्नागिरी शहरातील वैद्यकीय तसेच इतर विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संखेने उपस्थित होती. शहरातील नवीन भाजी मार्केट समोर शांतीनाथ प्लाझा, पहिला मजला येथे हे क्लिनिक आहे.

