नाणार रिफायनरीविरोधातील आंदोलकांचे गुन्हे मागे उध्दव ठाकरे यांचा नाणारवासियांना दिलासा महाराष्ट्राला रयतेचा राजा लाभला-विनायक राऊत

0

रत्नागिरी दि.२ प्रतिनिधी
आरे येथील जंगल वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरी विरोधात आंदोलनात करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेतले आहेत.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारतात अनेक महत्वाचे जनतेला अपेक्षित निर्णय घेतलेत यालाच म्हणतात रयतेचा राजा अशा शब्दात रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी नाणारवासियांवरील गुन्हे मागे घेताच प्रतिक्रिया दिली आहे.
नाणार येथे केंद्रातील भाजप सरकार रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत होते.विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांसोबत शिवसेनेने तीव्र आंदोलन छेडले होते.नाणार परिसरात सुरु झालेला हा लढा शिवसेनेने मु्ंबईत विधानभवनातून थेट दिल्ली पर्यंत नेत संसदेतही रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला होता.शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणार येथे येऊन स्थानिक ग्रामस्थांना प्रकल्प रद्द करू असा शब्द दिला होता.लोकसभा निवडणूकीपूर्वीच हा प्रकल्प रद्द करत उध्दव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला होता.

HTML tutorial

महाराष्ट्राला रयतेचा राजा लाभला-विनायक राऊत

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेत जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे.आरे येथील कारशेडला विरोध करत जंगल वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्या पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मागे घेतले त्यापाठोपाठ कोकणचे पर्यावरण आणि निसर्ग सौंदर्य राखण्यासाठी नाणार येथील रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाणारवासियांना दिलासा दिला आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्णायाचे नाणारवासियांनी स्वागत केले असून त्यांचे आभार मानले आहेत.रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानताना जनहिताचे निर्णय घेणारा रयतेचा राजा महाराष्ट्राला लाभला असल्याचे उद्गार काढले असून कोकणातील जनतेच्या मागे शिवसेना ठाम असल्याचे आवर्जून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here