अभाविप कडून रत्नागिरीत १,१११ फूट तिरंगा रॅली चे आयोजन

0

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून १,१११ फूट विक्रमी तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे कोकणात प्रथमच अशा प्रकारे रॅली होणार असून या मुळे कोकणात अभाविप कडून नवा इतिहास रचला जाणार आहे. हैद्राबाद येथे डॉ प्रियांका रेड्डी यांच्यावरील बलात्काराचा निषेध तसेच याविरुद्ध कायदा करण्यात यावा या भावनेसाठी आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या झंझावाती शौर्यगाथेच स्मरण करण्यासाठी अशा प्रकारच्या रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील विविध क्षेत्रातील १० कर्तृत्ववान महिलांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात येणार आहे. ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयापासून रॅली ला प्रारंभ होईल आणि लक्ष्मी चौक मैदानात रॅली चा समारोप होईल. या भव्य रॅली साठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अभविप कडून करण्यात येत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here