दुचाकी-डंपर धडकेत वृद्ध ठार

0

दाभोळ : दापोली-मंडणगड मार्गावर खेर्डीनजीक दुचाकी व डंपर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. काशिराम लक्ष्मण खामकर (वय ६४) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना खामकर रविवारी (ता.१) सकाळी साडेदहाच्या सुमारास दापोली-मंडणगड मार्गावरिल खेर्डीनजीक लाकडी पुलादरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिरे वाहतूक करणारा डंपरचालक अश्विन रमेश चव्हाण, करंजाणी हे डंपर (एम-०८- एच-१८९६) घेऊन दापोलीकडे येत असताना व दापोलीहून खेर्डी पानवाडीकडे निघालेले काशिराम खामकर दुचाकी (एमएच०८-एएम-७२४२) यांच्यात खेर्डी येथील वळणावर समोरासमोर धडक झाली. यामध्ये खामकर गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचाराकरिता दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तत्पूर्वी, त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची खबर खेर्डीचे सरपंच अनिल जाधव यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक मोहन पाटील करत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here