हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार

0

हैदराबाद: देशभरात गाजत असलेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी आज पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.

HTML tutorial

अधिक तपासासाठी पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळी नेलं होतं. त्यावेळी या आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु ते न थांबल्यानं पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता ही घटना घडली. माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, चकमकीची घटना ऐकून आपल्याला धक्का बसला. परंतु आरोपींना शासन मिळाल्याचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पीडितीच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.

७ नोव्हेंबरच्या रात्री २७ वर्षीय महिला डॉक्टरवर या चौघांनी अमानुष अत्याचार केले. दारू पिऊन असलेल्या या आरोपांनी महिला डॉक्टर आपली स्कूटी पार्क करत असल्याचे पाहिले आणि त्यांनी आपली योजना आखली. त्यांनी स्कूटीची हवा काढून टाकली आणि मदतीचा बहाणा करून तिचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर त्यांनी बलाकार केला आणि गळा दाबून तिची हत्या केली. आरोपी इथवरच न थांबता त्यांनी तिचे शव ट्रकमध्ये लादून टोलनाक्यापासून २५ किमी अंतरावर असलेल्या उड्डाणपुलावरून ते खाली फेकून दिले. पहाटे दूधवाल्याने शव पाहून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा अमानुष प्रकार उघडकीस आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here