मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बॅंकेतील घोटाळ्याने बॅंकेच्या खातेधारकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आता हे नुकसान भरून काढण्यासाठी पीएमसी बॅंक महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. पीएमसी बॅंकेतील खातेधारकांना न्याय मिळावा यासाठी पीएमसी बॅंकेचे राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गरज भासल्यास विलीनीकरणाबाबत राज्य सरकार रिझर्व्ह बॅंकेशीही चर्चा करेल, असे पाटील यांनी म्हटले आहेत.
