बेकायदा वाहतूक करणाऱ्या तीन खासगी आराम बसेसवर कारवाई

0

रत्नागिरी : कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत ट्रॅव्हल्समधून प्रवाशांची बेकायदेशिरपणे वाहतूक केल्याप्रकरणी लांजा कोर्ले फाटा येथे शनिवारी सायंकाळी ५ वा. समारास तीन लक्झरी बसेसवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत चार जणांविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन लक्ष्मण विचारे (३२, रा. ठाणे), प्रभाकर सीताराम घाणेकर (३५, रा. जाकादेवी), सचिन सरेश सरवणकर (३८, रा. पाचल, राजापूर) आणि कुंदन पांडुरंग तेलंग (३२, रा. पाचल नारकरवाडी, राजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे संशयित आपल्या ताब्यातील तीन लक्झरी ट्रॅव्हल्समधून ४७ प्रवाशांकडे ई-पास नसताना तसेच प्रवाशांचा पल्सरेट, ऑक्सिजन लेव्हल ईत्यादी बाबी न तपासता त्यांची वाहतूक करत होते. याप्रकरणी अधिक तपास लांजा पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:32 PM 03-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here