विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल

0

खेड : तालुक्यातील शिर्शी मोहल्ल्यात पोटात तीक्ष्ण हत्यार लागल्याने दि. 29 नोव्हेंबरला एका विवाहितेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी नवरा व सासू यांच्या विरोधात दि. 5 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.

खेड तालुक्यातील शिर्शी गावातील नाझनीन वासिफ हमदुले (वय 24) या विवाहितेचा दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घरात तीक्ष्ण हत्यार पोटात लागल्याने गंभीर जखमी झाली. तिला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयातून प्राप्‍त माहितीच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी शिर्शी गावात घटनास्थळी भेट दिली होती. मात्र, त्यानंतर नाझनीनच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन नाझनिन हिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्‍त केला होता. या घटनेचा खुनाच्या संशयातून तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. पैशाची मागणी करीत नाझनिनचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी दि. 5 रोजी पोलिसांनी नाझनिन हिचा पती वासिफ दाऊद हमदुले व सासू रियाना दाऊद हमदुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here