‘झटपट न्याय देण्याच्या प्रकारामुळे कायद्याचे राज्य धोक्यात येईल’

0

मुंबई – हैद्राबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळल्याच्या प्रकरणातील चारही आरोपी आज सकाळी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. परंतु, पोलिसांच्या कृतीवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पीडितेला न्याय देण्यासाठी वापरलेली पद्धत अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

HTML tutorial

उज्ज्वल निकम म्हणाले कि, पोलीस बेसावध आणि निष्काळजी होते का? बलात्काराचे आरोपी ठार झाल्याचा आनंद असला, तरी पोलिसांच्या कृत्याला जाहीर समर्थन दिल्याने ते कायदा हातात घेण्याची भीती आहे. तसेच झटपट न्याय देण्याच्या प्रकारामुळे कायद्याचे राज्य धोक्यात येईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, बलात्काराच्या या घटनेनंतर देशभरात रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. परंतु, आरोपींना तातडीने शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामान्यांनी व्यक्त केली होती. चारही आरोपींना त्याच ठिकाणी एन्काऊंटरमध्ये मारले गेल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here