सातारा जिल्हयात आजपासून ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन

0

सातारा : सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागावर कोरोनाची पकड अधिक घट्ट होत चालली आहे. हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाप्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. सातारा जिल्हयात कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 4 मे ला सकाळी 7 वाजलेपासून 10 मे ला रात्री 12 पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळात काय चालू काय बंद ?
1) सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पुर्णपणे बंद राहतील. परंतु या दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.
2) कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू राहतील. तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.
3) हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खादय पदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यतच सुरू राहतील. तसेच त्यासंबंधित इतर बाबींना दि. 14 एप्रिल 21 रोजीचे आदेश लागू राहतील.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:36 AM 04-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here