बिल गेट्स-मेलिंडा यांच्या वैवाहिक नात्याला तडा, घेतला घटस्फोटाचा निर्णय

0

नवी दिल्ली : सोमवारी संपूर्ण जगालाच एका निर्णयानं धक्का बसला. हा निर्णय होता मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाचा. जवळपास 27 वर्षांच्या वैवाहिक नात्यातून वेगळं होत त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.सध्याच्या घडीला या दोघांनीही परस्पर सहमतीनं हा निर्णय घेतला आहे. बिल गेट्स यांनी ट्विट करत लिहिलं, ‘आम्ही आमच्या नात्याबाबत फार विचार केला. अखेरीस हे नातं इथंच थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जीवनाच्या या पुढच्या टप्प्यावर आम्ही एकत्र पुढे जाऊ शकू याचा आम्हाला फारसा विश्वास नाही. आता आम्हा दोघांनाही आपआपला वेगळा असा वेळ हवा आहे. आम्ही जीवनाच्या नव्या टप्प्याच्या दिशेनं जाऊ इच्छितो’.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:47 AM 04-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here