रत्नागिरी : ऐनवली देऊळवाडी (ता. खेड) येथे रहिवासी मारुती गोविंद मोरे यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सुरेश बाबाजी मोरे याला अटक केली आहे. यातील आरोपी हा फिर्यादीचा पुतण्या असून गेले काही वर्षे त्यांचा जमिनीवरून वाद सुरू आहे. फिर्यादी घरी बसले असता आरोपी तेथे आला आणि जमीन माझ्या नावावर करून द्यायला सांगू लागला. तसेच फिर्यादी आणि त्याची सून दर्शना मोरे यांना शिवीगाळ करू लागला. फिर्यादीने जमीन देण्यास नकार दिल्यावर सुरेश मोरे याने तलवारीने फिर्यादीवर वार केला. तो फिर्यादीने चुकविला. परंतु निसटता वार मांडीला लागून मारुती मोरे जखमी झाले.
