बांद्रेवाडीत दोन लाखांचे दागिने पळविले

0

चिपळूण : तालुक्यातील दोणवली बांद्रेवाडी येथे एका घरातील कपाटात ठेवलेले एक लाख ९२ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद बांद्रे हे दोणवली बांद्रेवाडीत राहतात. त्यांनी त्यांच्या घरातील कपाटातील लॉकरमध्ये दागिने ठेवले होते. तसेच लॉकरची व कपाटाची चावी व्यवस्थित ठेवली होती. १ डिसेंबरला चोरट्याने चावी मिळवून कपाट उघडले. लॉकर उघडून आतील दागिने काढून घेतले. यात एक लाख १२ हजार रुपयांचे सोन्याच्या पट्ट्या व मंगळसूत्र, ५० हजार रुपयांचे नेकलेस, १२ हजार ५०० रुपयांची सोन्याची चैन व १५ हजार रुपयांची कर्णफुले असे एकूण एक लाख ९२ हजारांचे दागिने चोरट्याने लांबविले. हा प्रकार कळताच बांद्रे कुटुंबीयाने सर्वत्र शोधाशोध केली. पण दागिन्याचा शोध लागला नाही. या प्रकरणी त्यांनी चिपळूण पोलिसात तक्रार दाखल केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here