चिपळूण बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

0

चिपळूण : येथील बाजारपेठेत कोरोनाची भीती दूर सारून मंगळवारी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे काही दुकानांमधून सोशल डिस्टन्सिंग न राखताच खरेदी सुरू होती. तर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

तालुक्यात कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत तालुक्यात ६,१६२ रुग्ण सापडले असून ४,६२७ रुग्ण बरे झाले तर १३४१ रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या दोन दिवसांत रुग्ण संख्या कमी झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता बाजारपेठेतील भाजी बाजार रविवारपासून सुरु झाले आहे. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. मंगळवारी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. भाजी मंडई, पानगल्ली परिसरात ही झाली होती. मेडिकलची दुकाने वगळता अन्य जीवनावश्यक वस्तूंची विक्री सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरु ठेवायची आहेत. तरीही काही ठिकाणी हाफ शटर दुकाने उघडून व्यापार केला जात आहे. याविषयी गंभीरपणे दखल घेत पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी मंगळवारी काही व्यापाऱ्यांना समज दिली. तसेच दुकाने उघडी ठेवल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला. यानंतर काहींना एक हजार रुपयांचा दंड बजावला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:30 PM 04-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here