तलवारीने वार केल्याप्रकरणी एकाला अटक

0

खेड : तालुक्यातील ऐनवली देऊळवाडी येथे राहणारा मारुती गोविंद मोरे याच्यावर तलवारीने हल्ला करून त्याला जीवे ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सुरेश बाबाजी मोरे याला अटक केली आहे. खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेश मोरे हा मारुती मोरे यांचा पुतण्या असून गेले काही वर्षे त्यांचा जमिनीवरून वाद सुरू आहे. ५ डिसेंबरला मारुती मोरे घरी बसले असता सुरेश मोरे तिथे आला व जमीन माझ्या नावावर करून दे असे सांगून मारुती मोरे आणि त्यांची सून दर्शना मोरे यांना शिवीगाळ केली. मात्र मारुती मोरे यांनी जमीन देण्यास नकार दिल्यावर त्याने हातातील तलवारीने त्यांच्यावर वार केला. तो मारुती मोरे यांनी चुकवला. मात्र, निसटता वार त्याच्या मांडीला लागल्याने ते जखमी झाले. याबाबत खेड पोलिसात तक्रार दाखल केल्यावर सुरेश मोरे याच्या विरोधात खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here