रत्नागिरी :
सावध खेळी करत, भलत्याच नावांच्या चर्चेत गुंतवून ठेवत अचानकपणे बीजेपीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नावाची घोषणा केली आहे. बीजेपीचे आ. प्रसाद लाड यांनी याबाबतची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी आ. निरंजन डावखरे, माजी खासदार निलेश राणे, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, महेंद्र मयेकर आदी उपस्थित होते. आम्ही निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कमळ निशाणीवर निवडणूक लढवणार आहोत. भारतीय जनता पक्षात गटाचे राजकारण नसते. दीपक पटवर्धन यांच्या नावाला बाळ माने यांनी देखील याला मान्यता दिली आहे. हि निवडणूक आमच्यावर लादली आहे, आमचे उमेदवार सुसंस्कृत आहेत, एक दर्जेदार उमेदवार भाजपने दिला आहे. दीपक पटवर्धन उमेदवार असल्याने आमचं काम सोप्प झालंय आस मत यावेळी आ. प्रसाद लाड यांनी व्यक्त केलं.
पत्रकार परिषदेपर्यंत दीपक पटवर्धन यांच्या नावाबाबत सर्वांनाच अनभिज्ञ ठेवण्यात आले होते. तोपर्यंत राजेश सावंत आणि राजू कीर हे दोनही उमेदवार उमेदवारीबाबत विश्वास बाळगून होते. या सर्वांचे पाठबळ दीपक पटवर्धन यांना किती मिळते हे खूप महत्वाचे आहे. राज्यातील राजकारणाप्रमाणे रत्नागिरीत देखील बिजेपित गट निर्माण झाले आहेत. आजच्या पत्रकारपरिषदेत माजी आमदार बाळ माने यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. मात्र ते रत्नागिरी बाहेर असल्याने उपस्थित नाहीत असे सांगण्यात आले. रत्नगिरी बीजेपीमध्ये दीपक पटवर्धन विरुद्ध बाळ माने असे दोन गट आहेत. याचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो यावर बिजेपिची सर्व गणिते अवलंबून आहेत.
