गळ्यातील साखळ्या ओढणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्याचे पोलिसांपुढे आव्हान, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सुरु आहे काय?

0

रत्नागिरीत महिलांच्या गळ्यातील साखळ्या ओढून दुचाकीवरून धूम ठोकणाऱ्या घटनांत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. काही वर्षांपूर्वी देखील अशाच चोरीच्या घटनांनी पोलिसांना हैराण केले होते. आता थोड्याच दिवसांत संक्रात येईल व हळदीकुंकू समारंभ सुरु होतील. या निमित्ताने महिला दागिने घालून बाहेर पडतात. हीच वेळ साधून चोरते सक्रीय होतात. कालच शहरातील साळवी स्टॉप येथे सकाळी वृद्ध दाम्पत्याच्या मागून जाऊन ८५ हज्राराचे मंगळसूत्र हिसकावण्याची घटना घटना घडली. चार दिवसांपूर्वी आरोग्य मंदिर येथे अशीच एक घटना घडली. हा चोरटा रत्नागिरीत यापूर्वी बघितला आहे असे या महिलेचे म्हणणे आहे. या संशयिताचे रेखाचित्र देखील काढण्यात आले आहे. शहरात लावण्यात आलेले कॅमेरे या चोरीच्या घटनांचा उलगडा होण्यासाठी उपयोगी पडतील का ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here