रत्नागिरी : शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. ते राष्ट्रवादी पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारीसाठी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. गुरुवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
यापूर्वी शहरविकास आघाडीने एकत्र येत उमेदवारीसाठी मिलिंद कीर यांचे नाव पुढे केले होते. या शहर विकास आघाडीतून हळू हळू एक एक पक्ष बाहेर पडू लागला. शेवटी आज मिलिंद कीर यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. राज्यामध्ये शिवसेनेसोबत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीने मात्र नगराध्यक्षपदासाठी सेनेच्या विरोधात उमेदारी दिली आहे
