संगमेश्वर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील सात गावे व दहा वाड्यांना टँकरने नियमित पाणीपुरवठा सुरू झाला आहे. अजूनही चार गावे व ११ वाड्या टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात तीन दिवसांपूर्वीच टँकर सुरू करण्यात आला. यात सध्या शासकीय एक व खासगी एक असे दोन टँकर पाणीपुरवठा करत आहेत. यात पुर्ये तर्फे देवळे गावातील धनगरवाडी व गवळवाडी, साखरपा-गुरववाडी, पांगरीकोंडवाडी, पाचांबे (नेरदवाडी, जख्खीण टेप, मेढे). कुटगिरी -येडगेवाडी, पेढांबे-खालचीआळी या गावांना पाणी पुरवठा सुरू आहे. अजूनही परचुरीबौद्धवाडी, फणसवळे (मोर्डेकरवाडी, देवोळे प्रचितगड, गावठाण), विघ्रवली (खालचीवाडी,बौध्दवाडी, राववाडी, माळवाडी), बेलारी-धनगरवाडी, राजिवली-काळंबेवाडी व वांझोळे-सनगलेवाडी या गाव व वाड्यांना टँकरची प्रतीक्षा आहे. या गावांची पाहणी करून टँकर सुरू केला जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:57 PM 05-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here