नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेत देणार नाही समर्थन

0

मुंबई : शिवसेनेची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महत्वाकांक्षी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत वेगवेगळी भूमिका पाहायला मिळत असून शिवसेनेने काल या विधेयकाला लोकसभेत समर्थन दिल्यामुळे या विधेयकाबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा थेट प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही राज्यसभेत नागरिकत्व विधेयकाला समर्थन देणार नसल्याचे स्पष्ट केले. राज्यसभा सदस्यांकडून मी याची माहिती मागवली आहे. त्यावर विचार करुन अधिकची भूमिका स्पष्ट करेन असे म्हटले आहे.

शिवसेना राज्यसभेत या नव्या विधेयकाबाबत स्पष्टता आल्याशिवाय मतदान करणार नाही. शिवसेनेने काय भूमिका घ्यावी, हे कोणीही शिवसेनेला शिकवू नये. शिवसेनेने आपली सतत आपली भूमिका मांडली आहे. याबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. या विधेयकाच्या बाजूने शिवसेनेने लोकसभेत मतदान केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परंतु आमची भूमिका स्पष्ट असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

देशहित डोळ्यासमोर आमच्यासारखे सर्वच पक्ष ठेवून काम करतील. या विधेयकाबाबत अधिक स्पष्टता येणे आवश्यक आहे. हे विधेयक राज्यसभेत मांडले जाण्यापूर्वी त्यामध्ये सूचवलेल्या सूचनांची दखल घेणे आवश्यक आहे. तसेच अधिक स्पष्टता येत नाही तोवर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नसल्याचेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here