नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे दीपक पटवर्धन गुरुवारी भरणार अर्ज

0

रत्नागिरी नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवारदीपक पटवर्धन येत्या गुरुवारी (दि. १२ डिसेंबर) सकाळी शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरणार आहेत. यावेळी भाजप कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड, ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे, माजी खासदार डॉ. नीलेश राणेउपस्थित राहणार आहेत. सुसंस्कृत आणि सुशिक्षित तसेच नागरिकांचे प्रश्न जाणणारे उमेदवार अशी ओळख निर्माण करणारे पटवर्धन यांना शहरातून पाठिंबा मिळत असल्याचे शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी सांगितले. अर्ज भरण्यापूर्वी भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिका-यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात सकाळी ११ वाजता एकत्र जमावे. त्यानंतर अर्ज भरण्यात येणार आहे.

HTML tutorial

शिवसेनेने ही पोटनिवडणूक रत्नागिरीवासीयांवर लादली आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीत पटवर्धन यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिला असून ही निवडणूक जिंकायचीच, या ध्येयाने सारी ताकद लावली आहे. माजी खासदार डॉ. नीलेश राणेसुद्धा या निवडणुकीत प्रचाराची कमान सांभाळणार आहेत.

शहरात पाण्याची मोठी समस्या आहे, रस्त्यांवरही अनेक ठिकाणी खड्डे आहेत, तात्पुरती मलमपट्टी करून नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे. फवारणी न केल्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शहरात परिवर्तन घडवण्यासाठी नागरिक सज्ज आहेत. चांगले रस्ते, शहराची स्वच्छता, मुबलक पाणी, रोजगार, पर्यटन यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here