गाफील राहू नका, महाराष्ट्र अजूनही धोक्याच्या वळणावर : मुख्यमंत्री; जाणून घ्या मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

0

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णवाढ कमी होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं आहे. हे सगळं असलं तरी गाफील राहू नका, महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे :

▪️ मराठा आरक्षणाची लढाई आपण न्यायालयात लढत होतो. सर्व पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला होता.
▪️ दुदैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निराशाजनक निकाल लागला आहे.
▪️ एकमुखाने घेतलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालय हा निकाल दिला.
▪️ निराश झाला तर तो महाराष्ट्र कसला ?
▪️ मराठा समाजाला माझे मनःपूर्वक धन्यवाद. समाजाने या निर्णयाविरोधात कोणताही थयथयाट न करता सामंजस्य दाखवले आहे.
▪️ सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की हा राज्य सरकारचा अधिकारच नाही.
▪️ सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना एक प्रकारे आपल्याला मार्गच दाखवला आहे की, हा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींचा आहे.
▪️ सर्वोच्च न्यायालयाचे हे मार्गदर्शन. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे मराठा आरक्षणासाठी मी हात जोडून विनंती करतो.
▪️ हा अधिकार केंद्राचा आहे म्हटल्यावर आम्ही एकमुखी आपल्याला विनंती करतो की केंद्राने मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय द्यावा.
▪️ उद्या मी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना अधिकृत पत्रही लिहिणार आहे. हवंतर भेट देखील घेईन.
▪️ केंद्राच्या या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे.
▪️ जास्त वेळ न घालवता केंद्राने निर्णय घ्यावा.
▪️ काश्मीरमधील कलम ३७० हटवताना जी हिंमत, संवेदनशीलता दाखवली होती तीच हिंमत आता मराठा आरक्षणासाठी दाखवावी
▪️ सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र आणि मुंबईच्या कोरोना लढ्याचे कौतुक
▪️ कोरोनारूग्णसंख्या खाली येऊ लागली आहे. मात्र गाफीलपणा परवडणार नाही.
▪️ गाफील राहू नका, महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर
▪️ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तिसऱ्या लाटेचा इशारा दिलेला आहे. देशात तिसऱ्या लाटेची भीती
▪️ १२ कोटी डोस एकरकमी विकत घेण्याची राज्य सरकारची तयारी, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार
▪️ तिसऱ्या लाटेसाठी आपण तयारी सुरू केलेली आहे.
▪️ सद्यस्थितीत १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती. आपल्यापुढे ३००० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे लक्ष
▪️ महाराष्ट्राचे ‘मिशन ऑक्सिजन’. ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झालाच पाहिजे.
▪️ आतापर्यंतचा संयम आणि शांतता पुढेही दाखवा.
▪️ समाजविघातक वृत्तीपासून लांब राहा आणि सरकारवर विश्वास ठेवा.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:56 AM 06-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here