खेड : तालुक्यातील शिर्शी मोहल्ला येथील विवाहिता नाझनीन हमदुले हिच्या मृत्यूप्रकरणी पती वासिक दाऊद हमदुले व सासू रियाना दाऊद हमदुले या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पती वासिक हमदुले यास येथील पोलिसांनी अटक केली आहे. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाझनीन हमदुले हिला शिर्शी येथून माहेरून पैसे घेऊन ये असा तगादा लावत तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याचा ठपका पती व सासू यांच्यावर ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.