15 डिसेंबरपासून देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग RFID सिस्टम लागू होणार आहे. सर्व वाहनांवर फास्टॅग लावणे गरजेचे आहे. सरकारने हे पाऊल टोल नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगामुळे उचलले आहे. मात्र आता सरकार पार्किंगसाठी देखील फास्टॅग अनिवार्य करणार आहे. रस्ते, परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने हैदराबाद विमानतळावर एक पायलेट प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत हैदराबाद विमानतळावरील पार्किंगचे शुल्क फास्टॅगद्वारे घेतले जाईल. या प्रोजेक्टला दोन टप्प्यात सुरू केले जाईल. पहिल्या टप्प्यात केवळ आयसीआयसीआय बॅकद्वारे जारी करण्यात आलेले फास्टॅगद्वारेच शुल्क घेतले जाईल.