मुंबईत चोरट्यांनी पळवल्या कांद्याच्या गोणी!

0

देशभरात कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना आता मुंबईत कांदाचोरीची घटना उघडकीस आली आहे. डोंगरी परिसरातून 21 हजार रुपये किमतीचा कांदा चोरीला गेला आहे. देशात कांद्याच्या वाढत्या किमती थांबताना दिसत नाही. त्यातच आता कांद्याची चोरी सुरु झाल्याचं दिसत आहे. मुंबईतील डोंगरी परिसरात दोन दुकानांमध्ये कांदा चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here