तेजस (एमके-२) या फायटर विमानाच्या व्यावसायिक उत्पादनाला पुढच्या वर्षी फेब्रुवारी २०२० पासून सुरुवात होणार आहे. ऍरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक डॉ. गिरीश एस. देवधरे यांनी ही माहिती दिली. तेजस हे स्वदेशी बनावटीचे फायटर विमान आहे. तेजसचे एमके- २ व्हर्जन शक्तिशाली रडारसह अत्याधुनिक सेन्सर्सनी सुसज्ज असणार आहे. या फायटर जेटच्या एव्हिऑनिक्स सिस्टीममध्ये सुधारणा करण्यात आली असून ते दृष्टीपलीकडच्या लक्ष्यावर प्रहार करण्यास सक्षम असेल. एमके-१ आणि एमके-१अ पेक्षा तेजस एमके-२ ची इंधन टाकी मोठी असून त्यावरून जास्त शस्त्रास्त्रे वाहून नेता येतील.