शिवसैनिक अमरदीप परचुरे यांच्या वाढदिवसानिमित्त ७०० लिटर सॅनिटायझरची भेट

0

गुहागर : गुहागर शिवसैनिक अमरदीप परचुरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाणारे ७०० लिटर सोडियम हायपोक्लोराइड भेट म्हणून दिले. गुहागर तालुकावासीय कोरोनाशी लढत आहेत. त्यामध्ये आपले व्यक्तिगत योगदान असावे, या भावनेतून हा उपक्रम राबविल्याचे श्री. परचुरे यांनी सांगितले.

श्री. परचुरे युवासेनेचे गुहागर तालुका अधिकारी आहेत. तसेच शहरातील व्याडेश्वर देवस्थानचे कार्यवाहही आहेत. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पालशेतचे शाखाप्रमुख मिनार पाटील यांना ३०० लिटर सोडियम हायपोक्लोराइड भेट दिले. मिनार पाटील यांनी पालशेत गावामध्ये शिवसैनिकांच्या मदतीने या औषधाची फवारणी केली. गुहागर शहरातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन औषध फवारणी करणे आवश्यक होते. ही कल्पना त्यांनी शिवसेनेचे गुहागर शहरप्रमुख आणि गुहागर जिमखान्याचे अध्यक्ष नीलेश मोरे यांना सांगितली. तसेच फवारणीसाठी ४०० लिटर सोडियम हायपोक्लोराइड भेट दिले. गुहागर जिमखान्याने आरे भंडारवाडा, असगोली आणि गुहागर शहराच्या मुख्य परिसरात फवारणी केली. आज किरकोळ बाजारात सोडियम हायपोक्लोराईडची किंमत १०० रु. लिटर इतकी आहे. त्या हिशेबाने ७ हजार रुपयांचे हायपोक्लोराइड अमरदीप परचुरे यांनी भेट म्हणून दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:27 PM 07-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here