अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. २० – ३० रुपये किलोने विकला जाणारा कांदा थेट १०० ते १५० रुपये किलोवर पोहोचल्याने सामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी मनसेकडून सानपाडा येथे कांदा विक्री सुरु करण्यात आली.