मुंबईची खास ओळख असलेली बेस्टची दुमजली बस कालबाह्य़ होण्याच्या मार्गावर आहे. बेस्टच्या ताफ्यात असलेल्या १२० दुमजली बसगाडय़ांपैकी ७२ गाडय़ा येत्या वर्षभरात भंगारात काढाव्या लागणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने आपल्या अर्थसंकल्पीय अंदाजात म्हटले आहे. त्या जागी नव्या दुमजली बसगाडय़ा घेण्याबाबत मात्र बेस्टचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे येत्या काही वर्षांत दुमजली बस इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.