रत्नागिरी : प्रतिनिधी
कोकण बोर्डाचा निकाल दरवर्षी राज्यभर चर्चेत येतो. मात्र याच बोर्डातील विद्यार्थ्यांना स्थलांतर (मायग्रेशन) प्रमाणपत्रासाठी कार्यालयात वारंवार खेटे मारावे लागत आहेत. मायग्रेशन सर्टिफिकेट वेळेत मिळत नसल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी कोकण बोर्डाकडून मायग्रेशन सर्टिफिकेट मिळणे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असते. दहावी, बारावीचे निकाल लागून सुमारे दोन महिने उलटले आहेत. विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमांसाठी अॅडमिशन घेत आहेत. या प्रवेशासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट महत्त्वाचे असते.
