खासदार आणि जिल्हाधिकारी यांना ना. उदय सामंतांनी केले कॅमेरात ‘कैद’

0

रत्नागिरी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कामकाजाचा लेखाजोखा देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. शासनाचा माहिती विभाग अधिक सक्षम व आधुनिक करण्याच्या दृष्टीने आज या कार्यालयाला नवे दोन अत्याधुनिक कॅमेरे प्रशासनाकडून देण्यात आले. याचे वितरण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुलतः जिंदा दिल कलाकार असणारे ना. उदय सामंत यांना फोटोग्राफीचा मोह आवरता आला नाही. त्यांनी या अत्याधुनिक कॅमेरा द्वारे खासदार विनायक राऊत व जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची एक सुदर छबी कॅमेरात ‘कैद’ केली व हे कॅमेरे जिल्हा माहिती अधिकारी दैठणकर यांच्याकडे सुपूर्त केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:46 PM 07/May/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here