‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 4 लाख 62 हजाराहूंन अधिक नागरिकांची तपासणी

0

रत्नागिरी : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 4 लाख 62 हजार 539 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले असून यातून 305 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील 94 जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 770 पथकांनी तपास कामाला सुरुवात केली होती. आता सध्या 1450 पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. या अंतर्गत 1 लाख 49 हजार 605 घरांना भेटी देण्यात आल्या. यातून एकूण 1 लाख 37 हजार 862 कुटुंबातील 4 लाख 62 हजार 539 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या भेटीदरम्यान नागरिकांची ऑक्सीमीटरवर ऑक्सीजन पातळी तपासण्यासह त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे तसेच सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेणे आदी तपासण्यांचा समावेश आहे. या तपासणी दरम्यान 11,743 घरे बंद असल्याचे आढळून आले आहे यांची पातळी चालण्याच्या तपासणीनंतर 95 पेक्षा खाली गेली अशांची एकूण संख्या 395 इतकी आढळली आहे तर ताप सर्दी खोकला असणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या 677 इतकी होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
7:40 PM 07-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here