कोरोनावरील उपचारासाठी स्थानिक विकास निधीतून एक कोटी देणार : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : स्थानिक विकास निधीतून कोरोनावरील उपचार सुविधा वाढविण्यात येणार असून यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतील १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शु्क्रवारी बैठकीत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती कक्षात शुक्रवारी झालेल्या या बैठकीसाठी खा. विनायक राऊत, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते.

या निधीतून रत्नागिरी आणि राजापूर येथील सरकारी रुग्णालयांचे कामकाज अधिक उत्तम व्हावे यासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, रुग्णालयातील खांटाची संख्या वाढविण्यासह फ्रीज व इतर वस्तूंची उपलब्धता होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून खासगी सहकार्यातून कोकणातील ३ जिल्ह्यांसाठी १०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स प्राप्त झाले. त्यापैकी ५० रत्नागिरी जिल्ह्यासाठी मिळाले आहेत. यातून रत्नागिरी जिल्ह्यातील ५ मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघासाठी प्रत्येकी १० आहेत. यातील १० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स आणि रेमडेसिविर इंजेक्शनच्या ५० वायल्स सामंत यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:05 AM 08-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here