कोकणातील सागरी महामार्गाच्या प्रकल्प विकास आराखड्यात पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांचा समावेश करावा : आदिती तटकरे

0

अलिबाग : राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या सागरी महामार्गाच्या प्रकल्प विकास आराखड्यामध्ये पर्यटनस्थळांचा खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी, पर्यटनास चालना देण्यासाठी व पर्यटकांना इच्छित पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी चांगल्या पोहोच रस्त्यांची आवश्यकता आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयातील ९३ पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांचा समावेश सागरी महामार्गाच्या मूळ विस्तृत प्रकल्प आराखड्यामध्ये प्राधान्याने करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागास व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या. यांना आदेशित करण्याची मागणी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्राला निसर्गरम्य असा ७२० कि.मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. पर्यटनाकरिता याचा पुरेपूर वापर होण्यासाठी व कोकणातील परिसर “टुरिस्ट कॉरिडॉर” म्हणून विकसित करण्याकरिता महत्त्वाकांक्षी अशा सागरी महामार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागामार्फत सुरु आहे. या प्रस्तावित सागरी महामार्गालगत अनेक निसर्गरम्य पर्यटनस्थळे आहेत. सध्या या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्थितीत सुधारणा गरजेची आहे. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी कोकण विकासासाठी या पर्यटनस्थळांच्या पोहोच रस्त्यांचा सागरी महामार्गाच्या विकासाबरोबर प्रकल्प आराखडा तयार करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे सूचित केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:20 PM 08-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here