ट्रक-बोलेरो पिकअपचा अपघात; बोलेरो चालक गंभीर जखमी

0

लांजा : ट्रक आणि बोलेरो पिकअप या दोन वाहनांत समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बोलेरो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या दरम्याने मुंबई-गोवा महामार्गावर लांजा नर्सिंग क्वार्टर्स येथे घडली. जखमी चालकाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालवण ते रत्नागिरी ट्रक चालक गणेश नीळकंठ खोटे (४९, रा. नाचणे, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक (एमएच ०८, डब्ल्यू ८६७७) तर मुंबई ते देवगड बोलेरो चालक आकाशकुमार शंकर गौंडा बुध्दीहाल (२०, सध्या रा. सिंधुदुर्ग, मूळगाव कर्नाटक) हा आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप क्रमांक (एमएच ०४, केएफ ७९५२) ही चुकीच्या दिशेने समोरून येणाऱ्या ट्रक वर जाऊन आदळली. या अपघातात बोलेरो पिकअप चालक आकाशकुमार बुध्दीहाल हा गंभीर जखमी झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:57 PM 08-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here