धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटाची १२ रोजी पोटनिवडणूक

0

संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर या जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक १२ रोजी होत आहे. याकरीता शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. बुधवारी सकाळी ३ एस.टी. बसेस मधून ईव्हीएम मशीन निवडणूक केंद्रावर नेण्यात आली. धामापूर तर्फे संगमेश्वर या जिल्हा परिषद गटातील सदस्य असलेले सहदेव बेटकर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोट निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे शंकर भुवड, भाजपाचे डॉ. अमित ताठरे तर राष्ट्रवादीचे सुशिल भायजे हे तीन उमेदवार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या जिल्हा परिषद गटात ३१ मतदान केंद्र आहेत. या केंद्रावर १२४ कर्मचारी, ३१ पोलीस, झोनल अधिकारी ४, सहाय्यक झोनल अधिकारी ४, राखीव १६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here