कोरोनाच्या रुग्णांना आता रोखीने बिले भरण्याची मुभा; केंद्राचा निर्णय

0

नवी दिल्ली : देशात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून, आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता, कोव्हिड रुग्णालये, नर्सिंग होम्स आणि कोव्हिड सेंटर्ससह यांना ठराविक कालावधीसाठी २ लाखांवरील बिले रोखीने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. दोन लाखांवरील व्यवहारांवर सरकारने बंदी घातलेली असली तरी आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, कोरोना काळात कोरोना रुग्णांना सेवा देणारी रुग्णालये, मेडिकल्स, नर्सिंग होम्स, कोरोना केअर सेंटर्स आणि कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या इतर समकक्ष संस्थांना दोन लाखांवरील व्यवहार करण्यास मूभा देण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:04 PM 08-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here