खेड-भरणे गावातील रहिवासी संजय सिताराम मोडसिंग यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर स्वच्छतेचा संदेश देत समाजामध्ये जनजागृतीचा संदेश पोहचवण्याचे काम केले आहे. म.गांधी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे अध्यक्ष संजय सिताराम मोडसिंग यांची कन्या चि.सौ.कां. श्रध्दा हिचा शुभविवाह १४ डिसेंबर रोजी खेड पाटीदार भवनमध्ये होणार आहे. श्रध्दा हिच्या लग्नाच्या पत्रिकेवर गावतील भावकी, नातेवाईक यांचे नावे आहेत, मात्र या नावांबरोबरच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. सगळ्यात कौतुकाची बाब म्हणजे पर्यावरण संतुलन राहण्यासाठी स्वच्छतेचा संदेश देणारी काही ब्रीद वाक्ये त्यांनी छापली आहेत. श्री. मोडसिंग यांचे म्हणणे आहे की, स्वच्छ गाव करण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. भरणे गावातून नव्हे तर खेड तालुक्यातून प्लास्टिक हद्दपार झाले पाहिजे. यासाठीच मी लग्नपत्रिकेवर स्वच्छतेचा संदेश देणगी ब्रीद वाक्य टाकून सुरूवात केली आहे. या पत्रिकेच्या मागच्या बाजूला प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा, पर्यावरण हानीला बसेल आळा, कचराकुंडीचा वापर करूया, सुंदर परिसर निर्माण करूया, सुंदर परिसर निर्माण करूया, नका करू तझंमाझं, पर्यावरण आहे. सर्वाचे अशा आशयाचे ब्रीद वाक्य लिहिण्यात आली आहेत.