देशातील ऑक्सिजन वितरणासाठी सुप्रीम कोर्टानं नेमला टास्क फोर्स

0

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बहुतेक कोरोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. देशातील ऑक्सिजनच्या तुटवड्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी आता सुप्रीम कोर्टानं यात लक्ष घालून मोठी घोषणा केली आहे. देशातील ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी सुप्रीम कोर्टनं टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्समध्ये १२ सदस्यांचा समावेश असणार आहे.

देशातील ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या तुटवड्याच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचं बारकाईनं लक्ष ठेवलं आहे. यात ऑक्सिजन आणि औषधांचं सुयोग्य पद्धतीनं वितरण होणं गरजेचं असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर कोर्टानं टास्क फोर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. १२ सदस्यीय राष्ट्रीय टास्क फोर्स देशातील ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी नियोजनाचं काम करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं आज देशात ऑक्सिजन आणि औषधांच्या वितरणासाठी राष्ट्रीय टास्क फोर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टास्क फोर्समधील सदस्यांचीही नावं जाहीर करण्यात आली आहेत.

देशातील ऑक्सिजनच्या वितरणासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्स

  • डॉ. भवतोष विश्वास, माजी कुलगुरू, पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विश्वविद्यालय, कोलकाता
  • डॉ. देवेंद्र सिंह राणा, चेअरमन, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, सर गंगा रुग्णालय, दिल्ली.
  • डॉ. देवीप्रसाद शेट्टी, चेअरमन आणि कार्यकारी संचालक, नारायण हेल्थकेअर, बंगळुरू.
  • डॉ. गगनदीप कांग, प्रोफेसर, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तमिळनाडू.
  • डॉ. जेवी पीटर, संचालक, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तमिळनाडू.
  • डॉ. नरेश त्रेहन, चेअरमन, मेदांता रुग्णालय आणि हार्ट इंस्टिट्यूट गुरुग्राम.
  • डॉ. राहुल पंडित, संचालक, क्रिटिकल केअर मेडिसीन अँड आयसीयू, फोर्टिस रुग्णालय, मुलूंड (मुंबई) आणि कल्याण (महाराष्ट्र)
  • डॉ. सौमित्र रावत, चेअरमन, डिमार्ठमेंट ऑफ गॅस्ट्रोअँटरॉलॉजी आणि लिवर ट्रान्सप्लांट, सर गंगाराम रुग्णालय, दिल्ली.
  • डॉ. शिवकुमार सरीन, वरिष्ठ प्राध्यापक आणि डिपार्टमेंट ऑफ हेपेटोलॉजी प्रमुख, दिल्ली.
  • डॉ. जरीर एफ उदवाडिया, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, हिंदुजा रुग्णालय, ब्रिच कँडी हॉस्पीटल आणि पारसी जनरल हॉस्पीटल, मुंबई
  • सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
  • राष्ट्रीय टास्क फोर्सचे संयोजक देखील टास्कफोर्सचे सदस्य असणार आहेत. यात केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिव स्तरावरील अधिकाऱ्याचाही समावेश असेल. गरज पडल्यास कॅबिनेट सचिवच्या सहकारी अधिकाऱ्याचीही नियुक्ती केली जाऊ शकेल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:46 PM 08-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here