महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवत्त कर्मचारी सेवा समिती जिल्हा शाखा रत्नागिरी यांचे जिल्हास्तरीय द्वितीय पंचवार्षिक अधिवेशन दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भोगाळे येथील माधव सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष अब्बास मुल्ला हे अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून समितीच्या चिपळूण तालुका अध्यक्षा श्रीमती क्षमा जोशी या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षा राहतील. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. स्वरूपा साळवी, बांधकाम समिती सभापती विनोद झगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, म्हाडा अध्यक्ष आ. उदय सामंत, आ. शेखर निकम, आ. भास्कर जाधव, आ. राजन साळवी, आ. योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, सभापती सी. पूजा निकम, गटविकास अधिकारी सरिता पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांचे प्रास्ताविक, संघटनेचा आढावा, स्मरणिका प्रकाशन, वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार, संघटनेने केलेल्या ठरावाचे वाचन, सुषमा रमेश भिडे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार वितरण, मान्यवरांचे मनोगत असे कामकाज अधिवेशनाच्या कालावधीत सुरू राहणार आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष विनायक घटे, राज्य सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, राज्यस्तरीय नेते सिताराम शिंद, शंकर शेंडगे, रमेश चिपळूणकर, अशोक बसनकर, किशोर हातखंडकर, अरुण जोशी, कृष्णा उकार्ड आदींनी चिपळूण येथे येऊन अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.