श्री केदारलिंग ग्राम विकास मंडळ मुंबई कडून भडकंबा गावात मास्क व सॅनिटायझरचे वाटप

0

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याने तो रोखण्यासाठी व गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने काहीतरी करावे या भावनेने मंडळाकडून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. श्री केदारलिंग ग्राम विकास मंडळ भडकंबा मुंबई चे अध्यक्ष उदय बाईत, सचिव महेंद्र मोरे व खजिनदार नंदकुमार नवाले यांनी मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांशी फोनवरून संपर्क साधून सदर उपक्रमाची संकल्पना सर्वांसमोर मांडली. त्यास सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि सॅनिटायझरच्या ५०० बाटल्या व २,००० मास्क गावी पाठवून ते ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आले. या उपक्रमासाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रदीप मांडवकर यांनी विशेष मेहनत घेतली. वरील साहित्याचे वाटप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मा. सरपंच प्रतिक्षा ताई नवाले व मा. उपसरपंच प्रशांत उर्फ बापू शिंदे व संपूर्ण टीम यांच्या मार्गदर्शनाखाली भडकंबा गावातील प्रत्येक वाडीत वाटप करण्यात येत आहे. याचा शुभारंभ नवालेवाडी येथे करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भडकंबा गावातील सर्व वाडीतील स्थानिक नागरिक याच मोलाचे सहकार्य लाभले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:21 AM 10-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here