वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौर्‍यात या पाच खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष

0

पुढील महिन्यात सुरू होणार्‍या भारताच्या वेस्ट इंडिज दौर्‍यात अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये नवदीप सैनी हा पहिल्यांदाच संघात सहभागी झाला आहे. तर, दीपक चहर याला यापूर्वी संधी मिळाली होती. तर, खलील अहमद, मयांक अग्रवाल व श्रेयस अय्यर हे खेळाडूयापूर्वीदेखील संघात असले, तरी या खेळाडूंना चमक दाखवण्याची संधी आहे. जाणून घेऊ या, या खेळाडूंविषयी… 

IMG-20220514-WA0009

नवदीप सैनी : आपल्या वेगवान आणि अचूक गोलंदाजी मार्‍याने सर्वांचे लक्ष वेधणारा गोलंदाज म्हणजे नवदीप सैनी. आतापर्यंत खेळलेल्या 34 टी-20 सामन्यांत त्याने 30 विकेट्स मिळवल्या आहेत. तर, 43 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने 120 विकेट्स मिळवत आपली छाप पाडली. विशेष म्हणजे, सैनीचा समावेश हा टी-20 व एकदिवसीय संघात करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीने त्याने अनेक फलंदाजांना अडचणीत आणले आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here